Ranji Trophy 2025 : यशस्वी जैस्वालने झळकावले शतक; मुंबईचा पराभव टाळण्यासाठी ठोकला शड्डू, मुशीरची फिफ्टी, अजिंक्य अपयशी

Yashasvi Jaiswal Smashes Century : रणजी ट्रॉफी २०२५ मध्ये मुंबईच्या यशस्वी जैस्वालने पुन्हा एकदा आपली चमक दाखवली आहे. जयपूरमध्ये राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने शानदार शतक झळकावत १००० रणजी धावांचा टप्पा पार केला. केवळ २१ डावांत हा मैलाचा दगड पार करत त्याने सातत्यपूर्ण फॉर्म सिद्ध केला आहे.
Yashasvi Jaiswal hit his 5th Ranji Trophy hundred for Mumbai and completed 1000 runs in just 21 innings

Yashasvi Jaiswal hit his 5th Ranji Trophy hundred for Mumbai and completed 1000 runs in just 21 innings

esakal

Updated on

Yashasvi Jaiswal scores 5th Ranji Trophy hundred for Mumbai : भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेच्या तयारीसाठी रणजी करंडक स्पर्धेत खेळणाऱ्या यशस्वी जैस्वालने खणखणीत शतक झळकावले. मुंबईचा पहिला डाव २५४ धावांवर गुंडाळून राजस्थान संघाने पहिला डाव ६ बाद ६१७ धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावात २६३ धावांची पिछाडी भरून काढण्याचे आव्हान मुंबईसमोर आहे आणि अशा परिस्थितीत यशस्वीने शतक झळकावले आहे. त्याच्यासोबतीला मुशीर खान ( Musheer Khan) उभा राहिला. यशस्वीने पहिल्या डावात अर्धशतक झळकावले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com