
भारतीय अ क्रिकेट संघाचा नॉर्थम्पटनला इंग्लंड अ संघाविरुद्ध दुसरा चार दिवसीय क्रिकेट सामना ६ जूनपासून सुरू झाला आहे. या सामन्यात पहिल्याच दिवशी केएल राहुलने खणखणीत शतक ठोकलंय, त्यामुळे भारताने ३०० धावांचा आकडा सहज ओलांडला आहे. पण पहिल्याच दिवशी एक नाट्यमय घटनाही घडली. यशस्वी जैस्वालची विकेट वादग्रस्त ठरली.