Yashasvi Jaiswal Scores 29 but Mumbai Bowled Out for 131 as Mohammed Siraj Takes 3 in SMAT 2025
esakal
Mumbai suffered a dramatic collapse in SMAT 2025 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात शतकी खेळी करणारा यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईकडून खेळण्यासाठी परतला. आयुष म्हात्रे १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघासोबत असल्याने यशस्वीकडे सलामीची धुरा आली. आता फॉर्मात असलेला यशस्वी संघात असल्यावर मुंबई धावांचा डोंगर उभा करेल असे वाटले होते, परंतु प्रत्यक्षात हैरदाबादच्या गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. मुंबईचा संपूर्ण संघ १८.५ षटकांत १३१ धावांत तंबूत परतला.