
Australia vs India Boxing Day Test: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने बॉक्सिंग डे कसोटीत भारतासमोर विजयासाठी ३४० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे भारतासाठी विजय मिळवायचा असेल, तर इतिहास घडवावा लागेल. मात्र, भारतासाठी आव्हान कठीण झाले आहे. त्यातच या सामन्यात यशस्वी जैस्वालची विकेट वादग्रस्त ठरली.
शेवटच्या दिवशी भारताने ३४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नियमित अंतराने विकेट्स गमावल्या होत्या. १३० धावांवरच भारताने ६ विकेट्स गमावलेल्या होत्या. परंतु, एक बाजू सलामीवीर यशस्वी जैस्वालने सांभाळली होती. त्याने अर्धशतक केले होते. तसेच २०० पेक्षाही अधिक चेंडू खेळले होते.