Yograj Singh blasts MS Dhoni in hookah controversy
esakal
योगराज सिंह यांनी पुन्हा एकदा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर टीकेची झोड उठवली.
योगराज म्हणाले की इरफान, गंभीर, सेहवाग व हरभजन यांना माशीसारखे बाहेर फेकले गेले.
त्यांनी कपिल देव, बिशन सिंग बेदी आणि धोनीवर खेळाडूंना कचऱ्यासारखी वागणूक दिल्याचा आरोप केला.
Yograj Singh has reignited controversy by attacking MS Dhoni : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह याचे वडील योगराज सिंह यांनी पुन्हा एकदा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर इरफान पठाणचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये पठाणने भारतीय संघातून झालेल्या हकालपट्टीवर भाष्य केले होते.