
भारतीय क्रिकेटसाठी अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणचे योगदान मोठे राहिले आहे. ४२ वर्षीय युसूफने भारताचे वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले असून तो २००७ टी२० वर्ल्ड कप आणि २०११ वनडे वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचाही भाग राहिला आहे. दरम्यान, आता तो त्याच्या मुलालाही क्रिकेटपटू बनवण्याची तयारी करत असल्याचे नुकतेच दिसून आले आहे.
युसूफने त्याचा मोठा मुलगा आयानसोबत क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की युसूफ नेट्समध्ये फलंदाजी करत आहे. तसेच त्याचा मुलगा आयान त्याला गोलंदाजी करत आहे.