
Yuvraj Singh Defends Rohit Sharma and Gautam Gambhir : ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेनंतरच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला देशभरातून होणाऱ्य टीकेला सामोरे जावे लागले. त्यांच्या संघातील स्थानावर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले अशात दोघांचा सहकारी व माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगने दोघांचे समर्थन केले आहे. रोहितने याआधी संघासाठी खूप काही साध्य केले आहे, तर गौतम गंभीर नुकताच व्यवस्थेमध्ये आला अल्यामुळे त्याला थोडा वेळ देण्याची गरज आहे, असे म्हणत
युवराजने आपल्या मित्रांना पठिंबा दर्शवला. त्याचबरोबर देशांतर्गत क्रिकेटमध्ये कामगिरी करणाऱ्या करूण नायर सारख्या खेळाडूंना भारतीय संघात संधी मिळायला हवी अशी इच्छा युवराजने व्यक्त केली.