YUZVENDRA CHAHAL: लग्न तुटल्यानंतर चहलला पॅनिक अटॅक, दारूचं व्यसनही जडलं! २६ दिवस रिहॅबमध्ये काय घडलं?

Yuzvendra Chahal opens up about alcohol addiction: युजवेंद्र चहलने घटस्फोटानंतरच्या कठीण काळाबद्दल सांगितलं. दारू पिण्याचं वाढलेलं प्रमाण, २६ दिवसांचं रिहॅब आणि पॅनिक अटॅकबद्दल त्याने खुलासा केला.
YUZVENDRA CHAHAL

YUZVENDRA CHAHAL

esakal

Updated on: 

Yuzvendra Chahal opens up about alcohol addiction: भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. घटस्फोटानंतर त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या काळात दारू पिण्याचं प्रमाण वाढलं होतं. परिस्थिती इतकी बिघडली की त्याला २६ दिवस रिहॅब सेंटरमध्ये राहावं लागलं. आकाश चोप्राच्या पॉडकास्टमध्ये बोलताना चहलने या सगळ्या गोष्टी सांगितल्या.

चहल म्हणाला की, दारू पिण्याचं प्रमाण खूप वाढलं होतं. त्यानंतर त्याने रिहॅब सेंटरमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तिथे २६ दिवस राहिल्यानंतर त्याला स्वतःच्या सवयी समजल्या. आता तो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो आणि कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करत बसत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com