Yuzvendra Chahal announces retirement from first-class cricket
Yuzvendra Chahal retirement from red-ball cricket latest news: भारताच्या स्टार फिरकीपटूंपैकी एक असलेल्या युझवेंद्र चहलने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. इंस्टाग्रामवर पोस्ट लिहून त्याने हे जाहीर केले. पण, अजूनही वन डे व ट्वेंटी-२० क्रिकेट खेळण्याची भूक कायम असल्याचे सांगून त्याने टीम इंडियाचे दार ठोठावले आहे. त्याने लिहिले की,"मी पहिल्यांदा जो क्रिकेटचा चेंडू हातात धरला, तो लाल रंगाचा होता. मी १० वर्षांचा होतो आणि या खेळाच्या मी इतक्या खोलवर प्रेमात पडेन याची मला तेव्हा अजिबात कल्पना नव्हती."