

Yuzvendra Chahal Clean Bowled Ben Stokes
Sakal
Yuzvendra Chahal Clean Bowled Ben Stokes: इंग्लंडमध्ये सध्या काऊंटी चॅम्पियनशीप ही त्यांची देशांतर्गत स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत अनेक भारतीय खेळाडू विविध संघांकडून खेळत आहेत. भारताचा दिग्गज फिरकीपटू युझवेंद्र चहल देखील नॉर्थम्पटनशायर संघाचा भाग आहे.
या संघाचा डरहॅमविरुद्ध नॉर्थम्पटन येथे बुधवारपासून (२ सप्टेंबर) सामना सुरू आहे. या सामन्यात युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) कमालीचा चेंडू टाकून बेन स्टोक्सला (Ben Stokes) त्रिफळीचीत केले, ज्याची चर्चा होत आहे. त्याचा व्हिडिओही व्हायरल (Viral Video) होत आहे.