Yuzvendra Chahal creates history by becoming the first Indian bowler to claim 400 T20 wickets
esakal
Yuzvendra Chahal creates history in Syed Mushtaq Ali Trophy 2026: प्रथम श्रेणी क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर करणाऱ्या युझवेंद्र चहलने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये आपणे नाणे खणखणीत वाजवणे सुरू ठेवले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत हरियाणाकडून खेळणाऱ्या भारताच्या फिरकीपटूने तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने सामन्यात ३ विकेट्स घेत, असा विक्रम नोंदवला, जो आतापर्यंत एकाही भारतीय गोलंदाजाला नाही जमला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ४०० विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.