

Zimbabwe Defeat Bangladesh in 1st ODI
Sakal
ZIM vs BAN 1st ODI: बांग्लादेश सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात झिम्बाब्वेने बांगलादेशला २५ धावांनी पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० आघाडी घेतली आहे. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केली. हरारेमध्ये झालेल्या या सामन्यात गोलंदाजांना पोषक वातावरण होते. त्याचा फायदा झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी उचलला.
या सामन्यात झिम्बाब्वेने बांगलादेशसमोर १४२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ३३.१ षटकात बांगलादेशला सर्वबाद ११६ धावाच करता आल्या.