Zimbabwe beat Bangladesh by 13 runs in 2nd ODI
esakal
Zimbabwe clinch ODI series against Bangladesh: पहिल्या सामन्यातील लाजीरवाण्या पराभवानंतर बांगलादेशने गुरुवारी झिम्बाब्वेविरुद्ध दुसऱ्या वन डेत चांगला खेळ केला होता. विजयासाठी ३० चेंडूंत ३० धावा हव्या असताना हातात ४ विकेट्स होत्या, पण झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी जबरदस्त पुनरागमन केले. हातातून निसटलेला सामना झिम्बाब्वेने खेचून आणला आणि १३ धावांच्या विजयासह मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. रिचर्ड एनगाराव्हाच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वेचा खेळ पाहून २०२७च्या वन डे वर्ल्ड कपची उत्सुकता आतापासून वाढू लागली आहे.