ZIMBABWE HUMILIATE SRI LANKA IN 2ND T20I
esakal
झिम्बाब्वेने श्रीलंकेला फक्त ८० धावांत गुंडाळून ५ विकेट्सनी ऐतिहासिक विजय मिळवला.
श्रीलंकेची ही T20I मधील दुसरी निचांक धावसंख्या ठरली (८० धावा).
झिम्बाब्वेच्या ब्रॅड इव्हान्स व सिकंदर रझाने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
Zimbabwe historic win against Sri Lanka in Harare : दुबळ्या समजल्या जाणाऱ्य़ा झिम्बाब्वेने सिकंदर रझाच्या नेतृत्वाखाली खेळताना आणखी एक ऐतिहासिक विजयाची नोंद केली. आशिया चषक स्पर्धेतील माजी विजेत्या श्रीलंकेला त्यांनी ५ विकेट्स व ३४ चेंडू राखून पराभूत केले. या विजयासह झिम्बाब्वेने मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणारा सिकंदर प्लेअर ऑफ दी मॅच ठरला आणि त्याने सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला.