T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Blessing Muzarabani leaves PSL to join KKR IPL 2026: ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये प्रभावी कामगिरी करणारा झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझारबानी आता आयपीएल २०२६ मध्ये खेळताना दिसण्याची शक्यता आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) इस्लामाबाद युनायटेड संघाकडून खेळण्यासाठी त्याची निवड झाली होती. मात्र त्याने या स्पर्धेतून माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Blessing Muzarabani has withdrawn from PSL 2026 and is reportedly set to join Kolkata Knight Riders for IPL 2026

Blessing Muzarabani has withdrawn from PSL 2026 and is reportedly set to join Kolkata Knight Riders for IPL 2026

esakal

Updated on

Why Blessing Muzarabani withdrew from Pakistan Super League: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सच्या संघात मुस्ताफिजूर रहमानची जागा कोण घेणार याची उत्सुकता आहे... बांगलादेशच्या गोलंदाजाला KKR ने बीसीसीआयच्या सांगण्यावरून संघातून बाहेर केले. बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराचे ते उत्तर होते. पण, मुस्ताफिजूरच्या जागी KKR ने कोणत्याच खेळाडूचे नाव जाहीर केले नव्हते आणि आता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप गाजवणारा गोलंदाज शाहरुख खानच्या संघातून खेळताना दिसेल, अशी चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com