

Zimbabwe Team Celebration with Fans
Sakal
टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत सिकंदर रझाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या झिम्बाब्वे संघाने इतिहास घडवला आहे. या स्पर्धेत पाल्लेकेले येथे मंगळवारी (१७ फेब्रुवारी) होणारा झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड सामना पावसामुळे रद्द झाला.
नाणेफेकही या सामन्यात झाली नाही. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण देण्यात आला. यामुळे झिम्बाब्वेचे ५ गुण झाल्याने बी गटातून श्रीलंकेपाठोपाठ झिम्बाब्वेने सुपर - ८ फेरीचे (Zimbabwe in Super 8) तिकीट मिळवले. यामुळे ऑस्ट्रेलियाच्याही सर्व आशा संपल्या. ऑस्ट्रेलियावर (Australia) या स्पर्धेतून पहिल्याच फेरीतून बाद होण्याची नामुष्की ओढावली.