Alex Steele Cricketer Video: श्वास घ्यायला त्रास, तरीही पाठीला ऑक्सिजन सिलेंडर बांधून 'तो' उतरला मैदानात

Alex Steele Cricketer Video: क्रिकेटच्या मैदानावर एक अनोखी घटना पाहायला मिळाली आहे. त्याचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत आहे.
83-year-old Alex Steele playing cricket with oxygen cylinder
83-year-old Alex Steele playing cricket with oxygen cylinder

Alex Steele Cricketer Video: क्रिकेटच्या मैदानावर एक अनोखी घटना पाहायला मिळाली आहे. त्याचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत आहे. खरं तर, 83 वर्षीय स्कॉटिश माजी डोमेस्टिक क्रिकेटर अॅलेक्स स्टील पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर बांधून क्रिकेट खेळताना दिसला.

खेळाची आवड असेल तर वय किंवा कोणताही आजार तुम्हाला खेळण्यापासुन लांब करू शकत नाही. वयाच्या 80, 90 किंवा 100 व्या वर्षीही माणूस मैदानात कोणताही खेळ खेळू शकतो. असेच काहीसे 83 वर्षीय स्कॉटिश माजी डोमेस्टिक क्रिकेटर अॅलेक्स स्टीलने दाखवून दिले आहे.

83-year-old Alex Steele playing cricket with oxygen cylinder
Ind vs Pak : चेन्नईत रंगणार महासंग्राम! भारत-पाकिस्तान सेमीफायनलमध्ये आमने-सामने? जाणून घ्या समीकरण

खरेतर माजी स्कॉटिश क्रिकेटर अॅलेक्स स्टील नुकताच स्थानिक क्लब सामना खेळला. यावेळी तो पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर घेऊन विकेटकीपिंग करण्यासाठी मैदानात आला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे खूप कौतुक होत आहे तसेच सर्वजण त्याच्या क्रिकेटच्या आवडीला सलाम करत आहेत.

अॅलेक्स 2020 मध्येच इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस (IPF) या आजाराशी झुंज देत आहे. तेव्हा डॉक्टर म्हणाले होते की अॅलेक्स आता जास्तीत जास्त एक वर्ष जगू शकेल.

अॅलेक्स या आजाराशी झुंज देत असल्याने शरीरात अचानक ऑक्सिजनची कमतरता जाणवते. श्वास घेण्यास त्रास होतो. या आजारात बहुतांश लोकांना आपला जीव गमवावा लागतो. यामुळेच अॅलेक्स ऑक्सिजन सिलेंडर घेऊन क्रिकेटच्या मैदानात उतरला.

83-year-old Alex Steele playing cricket with oxygen cylinder
WI vs IND: सलग दोन पराभवानंतर टीम इंडियात होणार मोठे बदल! 'या' खेळाडूंना Playing 11 मधुन डच्चू?

अॅलेक्सने 1967 मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे लँकेशायरविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये इंग्लंड दौऱ्यावर पदार्पण केले होते. त्याने आपल्या 14 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 24.84 च्या सरासरीने 621 धावा केल्या. या दरम्यान त्याने दोन अर्धशतकेही झळकावली. अॅलेक्स हा 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये स्कॉटिश संघाचा नियमित खेळाडू होता.

1968 मध्ये आयर्लंडविरुद्ध खेळलेल्या सर्व सामन्यांमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 97 धावा होती. तसेच, यष्टिरक्षक म्हणून अॅलेक्स स्टीलने 11 झेल घेतले, तर दोन स्टंपिंग केले. पण आता वयाच्या 83 व्या वर्षीही तो क्रिकेटच्या मैदानावर उतरला आणि ऑक्सिजन सिलेंडरने विकेटकीपिंग केलं. याबद्दल त्यांचे खूप कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com