Cristiano Ronaldo : भावनिक क्षण! ख्रिस्तियानो रोनाल्डो रडला... मैदानावर एकटा उभा राहिला; फुटबॉलविश्व स्तब्ध Video

Emotional Cristiano Ronaldo Left in Tears: फिफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये पोर्तुगालच्या पराभवानंतर फुटबॉलविश्वाला हेलावून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले. स्पेनकडून १-० असा पराभव स्वीकारल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोला अश्रू अनावर झाले.
CRISTIANO RONALDO IN TEARS AFTER PORTUGAL'S FIFA WORLD CUP 2026 EXIT

CRISTIANO RONALDO IN TEARS AFTER PORTUGAL'S FIFA WORLD CUP 2026 EXIT

Updated on

Cristiano Ronaldo cries after Portugal World Cup exit: फुटबॉलविश्वातील महान खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याचे वर्ल्ड कप उंचावण्याचे स्वप्न अखेर अपूर्ण राहिले... स्पेनच्या मिकेल मेरिनोने ९०+१ मिनिटाला गोल करून पोर्तुगालला १-० असा पराभव पत्करण्यास भाग पाडले. रेफरीने मॅच संपल्याची शिटी वाजवताच स्पेनचे खेळाडू जल्लोष करत होते, तेच रोनाल्डो गुपचूप एकटा चालताना दिसला. त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. त्याला ढसाढसा रडून मन मोकळं करायचं होतं, परंतु त्याने स्वतःच्या भावनांना आवर घातला... प्रेक्षकांचे आभार मानले अने काही काळ संपूर्ण स्टेडियमभर नजर फिरवली अन् पॅव्हेलियनच्या दिशेने निघून गेला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com