Cristiano Ronaldo Breaks Down in Tears as Portugal Honours Diogo Jota on First Death Anniversary
esakal
Emotional Ronaldo Wears Jota's No. 21 Jersey After Portugal Win : पोर्तुगाल आणि क्रोएशिया यांच्यातला फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सामना नाट्यमय राहिला. पहिल्या हाफमध्ये वर्चस्व गाजवूनही पोर्तुगालला गोल करता आला नाही, परंतु क्रोएशियाने दुसरे सत्र गाजवले. ५३ व्या मिनिटाला इव्हान पेरिसिचच्या गोलने त्यांना आघाडी मिळवून दिली. ६८व्या मिनिटाला ख्रिस्तियानो रोनाल्डोने पेनल्टीवर गोल करून सामना बरोबरीत आणला. सामना अतिरिक्त ३० मिनिटांत जाईल असे वाटत असताना गोंझालो रामोसने ९०+४ मिनिटाला गोल करून पोर्तुगालचा विजय पक्का केला. पण, या सामन्यानंतर रोनाल्डो भावनिक झालेला दिसला.. त्याचा कंठ दाटून आला होता आणि अश्रू वाट मोकळे करत होते..