Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Fifa World Cup 2026 Portugal vs Uzbekistan: फुटबॉल विश्वातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने वर्ल्ड कप स्पर्धेत आणखी एक अविश्वसनीय विक्रम आपल्या नावावर केला. उझबेकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोल करत त्याने लिओनेल मेस्सी, पेपे यांनाही मागे टाकले.
Cristiano Ronaldo first player to score in six World Cups

Cristiano Ronaldo first player to score in six World Cups

esakal

Updated on

Portugal vs Uzbekistan Fifa Football World Cup Marathi News: लिओनेल मेस्सी, किलियन एम्बापे, हॅरी केन यांनी गोल केले.. मग ख्रिस्तियानो रोनाल्डो गोल केव्हा करणार? हा प्रश्न सर्वांना सतावत होता आणि मंगळवारी रात्री अखेर तो क्षण अनुभवायला मिळाला. फिफा वर्ल्ड कप स्पर्धेतील उझबेकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सहाव्या मिनिटाला रोनाल्डोने पोर्तुगालला १-० अशी आघाडी मिळवून दिली आणि वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम नावावर केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com