Cristiano Ronaldo retirement news
esakal
Cristiano Ronaldo reacts to retirement rumours : “जोपर्यंत तो खेळत आहे, तोपर्यंत त्याचा आनंद घ्या. हे लवकरच संपणार आहे,” क्रोएशियाविरुद्धच्या राऊंड ऑफ ३२ च्या सामन्यापूर्वी पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोची बहिण कॅटिया अव्हेइरोने पोर्तुगीज मीडिया आउटलेट स्पोर्ट टीव्हीवर केलेल्या विधानाने खळबळ उडाली. पोर्तुगालने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत बाद फेरीत २-१ अशा फरकाने क्रोएशियावर विजय मिळवून आगेकूच केली. पण, या सामन्यात एकच चर्चा रंगलेली आणि ती म्हणजे रोनाल्डोच्या निवृत्तीची... पण, सामन्यानंतर रोनाल्डोने या चर्चेवर मोठं विधान केलं आहे.