Cristiano Ronaldo : अखेर रोनाल्डोने 'अल नसर' सोबत 1728 कोटींच्या डीलबाबत केला खुलासा, म्हणाला...

Cristiano Ronaldo Al Nassr Deal
Cristiano Ronaldo Al Nassr Dealesakal

Cristiano Ronaldo Al Nassr Deal : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नेतृत्वातील पोर्तुगालने फिफा वर्ल्डकपची क्वार्टर फायनल गाठली आहे. मात्र राऊंड ऑफ 16 मधील स्वित्झर्लंडविरूद्धच्या सामन्यात तो बेंचवर बसला होता. विशेष म्हणजे पोर्तुगाल संघातील तो एकमेव असा खेळाडू आहे ज्याच्याकडे कोणत्याही क्लबचे कॉन्ट्रॅक्ट नाही. फिफा वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वीच रोनाल्डोने मँचेस्टर युनायडचेटच्या व्यवस्थापनाशी पंगा घेतला होता. त्यानंतर तो सौदी अरेबियाच्या अल नसर क्लबशी करार करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. स्वित्झर्लंडविरूद्धच्या सामन्यात तसे फलकही प्रेक्षकांच्या स्टँडमधून झळकले होते. मात्र याबाबत रोनाल्डोने कोणतेच वक्तव्य केले नव्हते.

Cristiano Ronaldo Al Nassr Deal
Rohit Sharma : जखमी अवस्थेत रोहितची फलंदाजी पाहून बायकोची इमोशनल पोस्ट! म्हणाली...

अखेर रोनाल्डोने सौदी अरेबियाच्या अल नसर क्लबसोबत खरंच डील झाली आहे का याबाबत खुलासा केला. माध्यमातील वृत्तांनुसार अल नसरने रोनाल्डोला वर्षाला 1728 कोटी रूपयांच्या पगाराची ऑफर दिली होती. या बातम्यांबाबत रोनाल्डो म्हणाला की, या सर्व बातम्या चुकीच्या आहेत आमच्यात कोणताही करार झालेला नाही.

पाचवेळा बॅलन डओर पुरस्कार मिळवणाऱ्या 37 वर्षाच्या रोनाल्डोने वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वीच मँचेस्टर युनायटेडचे व्यवस्थापक एरिक टेन हॅग यांच्याविरूद्ध मोर्चा उघडला होता. त्याने जाहीर मुलाखतीत मँचेस्टरचे व्यवस्थापक आणि इतर अधिकाऱ्यांवर आरोप केले होते. त्याचवेळी रोनाल्डोचा मँचेस्टर युनाटेडसोबतचा प्रवास थांबणार हे निश्चित झाले होते. त्यानंतर रोनाल्डो आणि क्लबने सामंजस्याने वेगळा मार्ग स्विकारला देखील.

Cristiano Ronaldo Al Nassr Deal
FIFA World Cup 2022 : आता उद्यापासून उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींचा थरार

रोनाल्डोने फिफा वर्ल्डकपमध्ये पोर्तुगलला पुढे घेऊन जाईल असे वाटले होते. मात्र राऊंड ऑफ 16 मध्येच त्याला बेंचवर बसवण्यात आले आणि पोर्तुगालने आपला सर्वोत्तम खेळ करत स्वित्झर्लंडविरूद्ध 6 - 1 असा विजय मिळवला. या सामन्यात त्याच्या जागी गोनसालो रामोसला संधी देण्यात आली होती. त्याने या सामन्यात हॅट्ट्रिक करत आपली योग्यता दाखवून दिली.

विशेष म्हणजे रोनाल्डो फक्त एका सामन्यासाठीच बेंचवर होता असं चित्र सध्या तरी दिसत नाहीये. रोनाल्डाची गोल करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे त्याला क्वार्टर फायनलमध्ये मोरोक्कोविरूद्धच्या सामन्यात देखील पहिल्या 11 जणांच्या संघात स्थान मिळेल असे वाटत नाही. त्यामुळेच रोनाल्डोला वर्ल्डकप संपण्यापूर्वी नवा क्लब मिळणे अवघड जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com