रेयाल माद्रिद अंतिम फेरीच्या उंबरठ्यावर

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

मुसंडी मारण्याची क्षमता 
उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यात 3-0 असा मोठा पराभव पत्करल्यानंतरही परतीच्या लढतीत मोठा विजय मिळविण्याची आशा ऍटलेटिको संघाला आहे. त्यांचे प्रशिक्षक दिएगो सिमोनी म्हणाले, "आम्ही संधी निर्माण करण्याचे प्रयत्न जरुर केले. आम्हाला शंभर टक्के यश निश्‍चित आले नाही. अशक्‍य शक्‍य करून दाखविण्यासाठी आम्ही आता प्रयत्न करू, आमच्या खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे.

माद्रिद - "गोल मशिन' ठरलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या आणखी एका हॅटट्रिकच्या जोरावर रेयाल माद्रिदने चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले. उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात त्यांनी ऍटलेटिको माद्रिदचा 3-0 असा पराभव केला. 

रेयालच्या या विजयाने या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील 60 वर्षांचा इतिहास कायम राहिला. रेयालने 1959 मध्ये युरोपियन करंडक उपांत्य फेरीत ऍटलेटिकोवर मात केली. तेव्हापासून आतापर्यंत द्विपक्षीय लढतीत तेच विजयी ठरले आहेत. 

ऍटलेटिकोचे सलग चौथ्या वर्षी चॅंपियन्सची अंतिम फेरी खेळण्याचे स्वप्न भंग पावले. यापूर्वी 2014 मध्ये लिस्बन आणि 2016 मध्ये मिलान येथे उपांत्य फेरीत त्यांना पराभव पत्करावा लागला. 2015 मध्ये उपांत्यपूर्व फेरीत त्यांचे आव्हान संपुष्टात आले. या तीनही वेळी रेयालच त्यांचे प्रतिस्पर्धी होते. 

यंदाच्या पहिल्या टप्प्यातील उपांत्य फेरीत रेयालने सुरवातीपासून वर्चस्व राखले. रोनाल्डोची हॅटट्रिक हे त्यांच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. ऍटलेटिकोकडून गोल करण्याचे दोन सुरेख प्रयत्न झाले. पण, दोन्ही वाया गेले. 

सामन्याच्या पूर्वार्धात दहाव्या मिनिटाला रोनाल्डोने हेडरद्वारे गोल करत संघाचे खाते उघडले. त्यानंतर पूर्ण सामन्यात रेयालनेच वर्चस्व राखले. पण गोल करण्यासाठी त्यांनी सामन्याच्या अखेरच्या सत्राची वाट पाहावी लागली. अखेरच्या वीस मिनिटांत रोनाल्डाने दोन वेळा जाळीचा वेध घेत ऍटलेटिको खेळाडूंना निराश केले. रोनाल्डोचे यंदाच्या मोसमात चॅंपियन्स लीगमध्ये दहा गोल झाले असून, तो मेस्सीपेक्षा केवळ एका गोलने मागे आहे. 

मुसंडी मारण्याची क्षमता 
उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यात 3-0 असा मोठा पराभव पत्करल्यानंतरही परतीच्या लढतीत मोठा विजय मिळविण्याची आशा ऍटलेटिको संघाला आहे. त्यांचे प्रशिक्षक दिएगो सिमोनी म्हणाले, ""आम्ही संधी निर्माण करण्याचे प्रयत्न जरुर केले. आम्हाला शंभर टक्के यश निश्‍चित आले नाही. अशक्‍य शक्‍य करून दाखविण्यासाठी आम्ही आता प्रयत्न करू, आमच्या खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे.

Web Title: Cristiano Ronaldo puts to bed questions of his Real Madrid big-game impact to leave Atletico Madrid in ruins again