Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Ronaldo creates history against Uzbekistan : वयाच्या ४१ व्या वर्षीही ख्रिस्तियानो रोनाल्डो फुटबॉलच्या मैदानावर इतिहास घडवत आहे. FIFA World Cup 2026 मधील उझबेकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोल करत त्याने पोर्तुगालसाठी वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूचा मान मिळवला.
Cristiano Ronaldo becomes Portugal's top World Cup goalscorer

Cristiano Ronaldo becomes Portugal's top World Cup goalscorer

esakal

Updated on

Portugal vs Uzbekistan Fifa Football World Cup Marathi News: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या चाहत्यांची आज झोप आनंदाने उडणार आहे.. लिओनेल मेस्सी धडाधड गोल करतोय, पण रोनाल्डोला सूर केव्हा गवसणार? या प्रश्नाचे उत्तर स्टार फुटबॉलपटूने मंगळवारी दिले. फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत उझबेकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने पहिल्या हाफमध्ये दोन गोल करून अनेक विक्रमांना गवसणी घातली. तो सलग सहा वर्ल्ड कप स्पर्धेत गोल करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com