esakal | कॅप्टन असावा तर असा! सहकाऱ्यांसाठी धोनीचा धाडसी निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व संघातील खेळाडू आणि सहकारी आपापल्या घरी परतू लागले आहेत.

कॅप्टन असावा तर असा! सहकाऱ्यांसाठी धोनीचा धाडसी निर्णय

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

चेन्नई : टीम इंडियाचा (Team India) माजी कॅप्टन आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जची (CSK) धुरा आपल्या खांद्यावर पेलणाऱ्या कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) एक मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या सहकाऱ्यांसाठी कायपण करण्यासाठी त्यानं एक निर्णय घेतला आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. चेन्नईच्या टीममधील सर्व खेळाडू जोपर्यंत त्यांच्या घरी सुखरूप पोहोचत नाहीत, तोपर्यंत धोनी घरी परतणार नाही. (CSK captain MS Dhoni delays return to Ranchi till all his teammates depart)

हेही वाचा: VIDEO : स्मृतीच्या कुकिंगवर हरमनप्रीतला नाय भरवसा

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व संघातील खेळाडू (Players) आणि सहकारी (Support Staff) आपापल्या घरी परतू लागले आहेत. चेन्नईच्या खेळाडूंशी झालेल्या मीटिंगमध्ये धोनी म्हणाला की, आयपीएलचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं. त्यामुळे परदेशातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना घरी जाण्यासाठी प्राथमिकता दिली पाहिजे. ते घरी लवकर पोहोचतील यासाठी प्रयत्न करने गरजेचे आहे.

हेही वाचा: जडेजा म्हणतो, खास मित्रांसोबत मी सुरक्षित ठिकाणी

धोनी सर्वात शेवटी घरी जाणार

चेन्नई सुपर किंग्जच्या एका प्रतिनिधीने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटले आहे की, माही म्हणाला की, तो सर्वात सेवटी हॉटेलमधून बाहेर पडणार आहे. परदेशातील खेळाडू सर्वात अगोदर जातील, त्यानंतर भारतीय खेळाडू आपापल्या घरी परततील. जेव्हा सर्व सहकारी सुरक्षितपणे आपापल्या घरी परततील त्यानंतरच माही घरी जाणार आहे.

हेही वाचा: Video : भावा खेळायला यायच्या आधी शूजची लेस नीट बांधायला शिक!

दरम्यान, इंग्लंडचे खेळाडू सर्वात आधी मायदेशी परतले आहेत. आयपीएलच्या सर्व टीममध्ये खेळणारे इंग्लंडचे सर्व खेळाडू विमानाने इंग्लंडला पोहोचले. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालदीवमार्गे त्यांच्या देशात जाणार आहेत. न्यूझीलंडचे खेळाडू टेस्ट सीरिजमध्ये सहभागी होण्यासाठी मायदेशी न जाता थेट इंग्लंडला रवाना होतील. फक्त ट्रेंट बोल्ट न्यूझीलंडला जाणार आहे.

क्रीडा विश्वातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.