जडेजा म्हणतो, खास मित्रांसोबत मी सुरक्षित ठिकाणी

याठिकाणी आल्यानंतर मला आता कशाचीही भिती वाटत नाही, असा उल्लेखही त्याने आपल्या पोस्टमध्ये केलाय.
ravindra jadeja
ravindra jadeja twitter
Updated on

IPL 2021 स्पर्धा स्थगित झाल्यानंतर खेळाडू आपापल्या घरी परतण्याची तयारी करत आहेत. काही सुरक्षित घरी पोहचले आहेत तर काही अद्याप प्रतिक्षेत आहेत. चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) ताफ्यातील काही सदस्य कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यामुळे त्यांना क्वारंटाईनचा कालावधी पुर्ण करावा लागणार आहे. दुसरीकडे ज्या खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) ट्विटरच्या माध्यमातून सुरक्षित ठिकाणी पोहचल्याची माहिती दिलीये. याठिकाणी आल्यानंतर मला आता कशाचीही भिती वाटत नाही, असा उल्लेखही त्याने आपल्या पोस्टमध्ये केलाय.

ravindra jadeja
VIDEO : स्मृतीच्या कुकिंगवर हरमनप्रीतला नाय भरवसा

रविंद्र जडेजाने आपल्या फार्म हाउसवरील फोटो शेअर केल्याचे दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलेल्या फोटोमध्ये तो आपल्या खास मित्रांसोबत वेळ घालवणार असल्याचे सांगताना दिसते. आता तुम्ही म्हणाल कोरोना काळात तो कोणात्या मंडळींना घेऊन बसणार आहे. त्याने आपल्या फार्महाऊसमधील घोड्यांचा फोटो शेअर केलाय. घोडेस्वारीचा छंद बाळगणाऱ्या जड्डूची ही मित्रमंडळी त्याच्यासोबत असणार आहे. राजपूत कुटंबियातून असणारा जडेजाकडे खूप सारे घोडे आहेत. वीर नावाच्या घोड्याचे निधनाची वार्ताही त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्याचे पाहायला मिळाले होते. क्रिकेटमधून ब्रेकवर असताना तो याच आपल्या मित्रांसोबत बराच वेळ घालवत असतो.

ravindra jadeja
IPL 2021: स्पर्धा रद्द झाल्यास खेळाडूंना फुल्ल सॅलरी मिळणार?

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रविंद्र जडेजाने दमदार कामगिरी केली होती. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दमदार कमबॅक केले होते. त्यांनी पाच सामन्यातील विजयासह 10 गुणही मिळवले. संघाच्या दमदार कामगिरीत रविंद्र जडेजाने मोलाचा वाटा उचलला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात जडेजाने जबरदस्त कामगिरी केली होती. 62 धावांच्या नाबाद खेळीत त्याने एका षटकात 36 धावा कुटल्या होत्या याच सामन्यात त्याने ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स याना बोल्ड केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com