esakal | Video: धोनीकडून कॅच सुटूच कसा शकतो? चाहत्यांना प्रश्न

बोलून बातमी शोधा

MS Dhoni
Video: धोनीकडून कॅच सुटूच कसा शकतो? चाहत्यांना प्रश्न
sakal_logo
By
सुशांत जाधव

जगातील सर्वात फिटनस क्रिकेटर्सची यादी महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नावाशिवाय अधूरीच राहिल. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आयपीएलच्या मैदानात उतरल्यानंतर त्याच्यातील चपळता कमी झालेली नाही. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मधील बुधवारच्या सामन्यात धोनीकडून मोठी चूक झाल्याचे पाहायला मिळाले. जगातील सर्वोत्तम विकेट किपर असलेल्या धोनीने सहज आणि सोपा कॅच सोडला. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Superkings) आणि डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सनराइझर्स हैदराबाद यांच्यात दिल्‍लीतील अरुण जेटली मैदानावर सामना झाला. चेन्नईने या सामन्यात दिमाखदार विजयही नोंदवला. पण चेन्नईच्या विजयासह चर्चा रंगली ती धोनीने सोडलेल्या कॅचची.

हेही वाचा: IPL 2021: ऋतू बहरला; CSK पुन्हा टॉपला!

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो यांनी हैदहाबादच्या डावाला सुरुवात केली. दुसरीकडे चेन्नईकडून दीपक चाहरने पहिली ओव्हर टाकली. चाहरच्या ओव्हरमधील दुसऱ्याच बॉलवर जॉनी बेयरस्‍टोच्या बॅटची कड घेऊन चेंडू धोनीच्या दिशेने आला. सहज आणि सोपा वाटणारा कॅच धोनीने सोडल्याचे पाहायला मिळाले. धोनीकडून इतका सोपा कॅच मिस होऊ शकतो, हे क्रिकेट चाहत्याला पटण्यापलीकडे होते.

चूक नडली नाही हेच धोनीचं नशीब

एमएस धोनीने दोन्ही हातांनी बॉल पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आले नाही. धोनीचे नशिब चांगले म्हणून ही चूक संघाला अधिक महागात पडली नाही. जॉनी बेयरस्टो अवघ्या 7 धावा करुन माघारी फिरला. परंतु बेयरस्टोचा कॅच सुटल्यानंतर धोनीकडून हे कस होऊ शकत? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. धोनी इतका सोपा कॅच सोडू शकतो हे क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देणारेच होते.