esakal | IPL 2021 : प्रितीच्या पंजाबची झटपट अ‍ॅक्शन; मलानची जागा भरली
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2021 : प्रितीच्या पंजाबची झटपट अ‍ॅक्शन; मलानची जागा भरली

IPL 2021 : प्रितीच्या पंजाबची झटपट अ‍ॅक्शन; मलानची जागा भरली

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021 : पंजाब किंग्जने (Punjab Kings)आयपीएलच्या उर्वरित स्पर्धेतून माघार घेतलेल्या टी-20 स्पेशलिस्टच्या जागा काही वेळातच भरली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एडम मार्करम याला पंजाबच्या ताफ्यात मलानचा बदली खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. शनिवार इंग्लंडचा फलंदाज डेविड मलान याने वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात त्याला केवळ एका सामन्यात संधी मिळाली होती.

बदली खेळाडू म्हणून मार्करमचा संघात समावेश करण्यात आल्याची माहिती पंजाब किंग्जने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे. 19 सप्टेंबरपासून आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धा युएईतील तीन वेगवेगळ्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. त्यापूर्वी डेविड मलानसोबत सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेयरस्ट्रो आणि क्रिस वोक्स या तिंघांनी स्पर्धेत माघार घेतली होती.

हेही वाचा: IND vs ENG : इंग्लंडचा आडमुठेपणा; विराटचा प्रस्ताव नाकारला

दक्षिण आफ्रिकेचा मार्करम पहिल्यांदाच आयपीएलच्या मैदानात उतरणार आहे. 26 वर्षीय मार्करमने 13 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 405 धावा केल्या आहेत. यात त्याने 4 अर्धशतके झळकावली आहेत. 70 ही त्याची टी-20 तील सर्वोच्च धावसंख्या आहे.

हेही वाचा: IPL 2021 : गळती लागली! इंग्लंडच्या त्रिकूटाची स्पर्धेतून माघार

पंजाब किंग्जने डेविड मलानसाठी मोठी रक्कम मोजली होती. 1 कोटी 50 लाख रुपयांची बोली लावून पंजाबच्या संघाने जगातील नंबर वन टी-20 फलंदाजाला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले. पण त्याला पहिल्या टप्प्यात फार खेळण्याची संधीच दिली गेली नाही. ज्या सामन्यात मलानला संधी मिळाली त्यात त्याने अवघ्या 26 धावा केल्या होत्या. पंजाब किंग्जचा संघ दुसऱ्या टप्प्यात 21 सप्टेंबरला मैदानात उतरणार आहे. त्यांच्यासमोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान असेल. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ही लढत रंगणार आहे.

loading image
go to top