Prashant Veer Six Video Viral
esakal
आयपीएल २०२६ साठी काल लिलाव पार पडला. या लिलावात अनकॅप खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात बोली लावण्यात आली. सीएसकेनेही १४.२० कोटी रुपये देऊन प्रशांत वीर आणि तेवढ्याच किंमतीत कार्तिक शर्मा या अनकॅप खेळाडूंना आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतलं. मात्र, आता यावरून विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. एका अनकॅप खेळाडूला १४ कोटी रुपयात खरेदी करणं योग्य आहे का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.