
Ruturaj Gaikwad Wedding Photos: अखेर विकेट पडली! ऋतुराज गायकवाड अडकला लग्नबंधनात; फोटो व्हायरल
चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर आणि गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेचा विषय ठरलेला ऋतुराज गायकवाड काल विवाहबंधनात अडकला आहे. ऋतुराज गायकवाडचे काल म्हणजेच (3 जून रोजी) उत्कर्षा पवारसोबत लग्नगाठ बांधली आहे.
ऋतुराज गायकवाडची पत्नी उत्कर्षा ही देखील महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू आहे. उत्कर्षा गोलंदाजीसह फलंदाजी देखील करते. उत्कर्षाने तिचा शेवटचा सामना नोव्हेंबर २०२१ मध्ये पंजाबविरुद्ध एकदिवसीय ट्रॉफीमध्ये खेळला होता.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघामध्ये ऋतुराज गायकवाडला राखीव खेळाडू म्हणून संधी मिळाली आहे. पण या सामन्याआधीच ऋतुराजने लग्नामुळे आपलं नाव मागे घेतलं आहे. तर गुरुवारी उत्कर्षा पवार हिच्यासोबत मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. आता त्यांच्या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
दोघांच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले होते. ऋतुराजने हातावर उत्कर्षाच्या नावाची मेहेंदी काढली होती. ऋतुराज व उत्कर्ष क्रिकेट थीमची मेहेंदी काढली होती. ऋतुराजने त्याच्या एका हातावर लग्नाची तारीख काढली आहे. तर दुसऱ्या हातावर दोघांच्याही नावाचे इंग्रजीतील पहिले अक्षर घेऊन बॅट आणि बॉलचं डिझाइन काढलं आहे.

कोण आहे उत्कर्षा पवार?
उत्कर्षा स्वत: एक क्रिकेटर आहे आणि ती महाराष्ट्र महिला क्रिकेट संघासाठी खेळलेली आहे. उत्कर्षा महाराष्ट्र अंडर-१९ संघासाठी २०१२-१३ आणि २०१७-१८ मध्ये खेळली होती. महाराष्ट्राच्या सीनियर टीममध्ये तिची निवड झाली होती. उत्कर्षाने अष्टपैलू खेळाडू म्हणून मैदान गाजवलं आहे. १८ महिन्यांपूर्वी उत्कर्षाने शेवटचं क्रिकेट खेळलं होतं. सध्या ती आरोग्य विज्ञान संस्थे (INFS) मध्ये शिक्षण घेत आहे.