Hardik Pandya News : विमानतळावर हार्दिक पांड्याची 5 कोटींची घड्याळं जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hardik Pandya
Hardik Pandya News : विमानतळावर हार्दिक पांड्याला रोखलं; 5 कोटींची घड्याळे जप्त

विमानतळावर हार्दिक पांड्याची 5 कोटींची घड्याळं जप्त

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू युएईमधून (UAE) मायदेशी परतला आहे. विमानतळावर कस्टम विभागाने त्याच्याकडून दोन महागडी घड्याळ जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. हार्दिक पांड्याकडे दोन घड्याळांचे बिल नसल्यामुळे ती ताब्यात घेण्यात आली असून या घड्याळांची किंमत 5 कोटींच्या घरात असल्याचे समजते.

हेही वाचा: ICC Most Valuable Team : बाबर कॅप्टन; टीम इंडियातील खेळाडूंची किंमत शून्य!

आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले आहे. भारतीय संघासोबतच हार्दिक पांड्याही रविवारी रात्री उशीराने भारतात परतला. विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला रोखले. त्याच्याकडील दोन घड्याळे जप्त करण्यात आली आहेत. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला नावाला साजेसा खेळ करता आला नव्हता. पाठिच्या दुखापतीनंतर अष्टपैलूच्या रुपात तो टीम इंडियासाठी उपयुक्त ठरताना दिसत नाही. त्यामुळेच न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेतून त्याला वगळ्यात आले आहे.

हेही वाचा: फेडररसाठी बावीसावं वरीसही ठरणार धोक्याच!

यापूर्वीही क्रुणाल पांड्या पांड्याबाबत घडली होती अशीच घटना

युएईच्या मैदानात रंगलेल्या गतवर्षीच्या आयपीएल हंगामानंतर मायदेशी परतलेल्या क्रुणाल पांड्याकडे अतिरिक्त सोने आढळून आले होते. दोन सोन्याच्या बांगड्यांसह काही महागडी घड्याळे त्यावेळी क्रुणाल पांड्याकडून जप्त करण्यात आली होती. डिक्लेरेशन न दिल्यामुळे त्याच्या या वस्तू ताब्यात घेण्यात आल्या होत्या. कस्टम ड्यूटीच्या स्वरुपात नियमानुसार ठराविक टक्क्यांच्या स्वरुपात रक्कम क्रुणाल पांड्याला भरावी लागली होती.

loading image
go to top