
Mirabai Chanu : पाकिस्तानचा सुवर्ण जिंकणारा वेटलिफ्टर मीराबाईचा जबरा फॅन
Commonwealth Games : राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये (Weightlifting) भारताने (India) चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. मात्र काल भारताला पुरूष 109+ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावता आले नाही. भारताचा गुरदीप सिंहला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते. याच वजनीगटात पाकिस्तानच्या नूह दस्तगीर बट्टने (Nooh Dastagir Butt) रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले. त्याने एकूण 405 किलो वजन उचलले. हा रेकॉर्ड ब्रेक करणारा पाकिस्तानी वेटलिफ्टर भारताच्या मीराबाई चानूचा (Mirabai Chanu) जबरा फॅन निघाला.
हेही वाचा: Cricketer Love Story: या स्वप्नसुंदरीच्या प्रेमात पडला होता राहुल चहर, समुद्रकिनाऱ्यावर केलं रोमँटिक लग्न
नूहने सुवर्ण पदक जिंकल्यानंतर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'ज्यावेळी मीराबाई चानूने माझे अभिनंदन केले आणि माझ्या कामगिरीचे कौतुक केले तो क्षण माझ्यासाठी खूप गौरवशाली क्षण होता.' पाकिस्तानच्या 24 वर्षाच्या नूहने राष्ट्रकुल स्पर्धेत स्नॅच प्रकारात 173 किलो वजन उचलले. तर क्लीन अँड जर्क प्रकारात त्याने 232 किलो वजन उचलून विक्रम केला. त्याने एकूण 405 किलो वजन उचलून सुवर्ण भार पेलला. त्याने या वयोगटातील तीनही रेकॉर्ड एका झटक्यात तोडले.
तीनही विक्रम मोडणाऱ्या नूहने भारतीय स्टार वेटलिफ्टरबद्दल गौरवउद्गार काढले. तो म्हणाला, 'आम्ही मीराबाईकडे आमचा प्रेरणास्त्रोत म्हणून पाहतो. त्यांनी आम्हाला दाखवून दिले की दक्षिण आशियाई खेळाडू देखील ऑलिम्पिक पदक जिंकू शकतात. ज्यावेळी त्यांनी टोकियो ऑलिम्पिक पदक जिंकले होते त्यावेळी आम्हा सर्वांना तिचा खूप अभिमान वाटला होता.'
हेही वाचा: VIDEO : पत्नीच्या उपस्थितीवरून प्रश्न विचारत किशनने सूर्यकुमारला टाकले अडचणीत
नूह 109+ किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकणाऱ्या गुरदीप बद्दल म्हणाला, 'मी एका भारतीय वेटलिफ्टरबरोबर स्पर्धा करत होतो असं नाही. मी फक्त माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत होतो.' गुरदीप सिंग प्लस वजनीगटात राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय वेटलिफ्टर बनला.
नूह बटने 2 आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारताचा दौरा केला आहे. त्याने पहिली स्पर्धा 2015 मध्ये पुण्यात, दुसरी गुवाहाटी मधील स्पर्धा खेळण्यासाठी तो भारतात आला होता. याबद्दल बोलताना तो म्हणाला की, 'मी दोन वेळा भारताचा दौरा केला आहे. मला ते समर्थन मिळाले मी ते कधीही विसरू शकत नाही. मी पुन्हा एकदा भारतात जावू इच्छितो. मला असे वाटते की माझे पाकिस्तानपेक्षा जास्त चाहते भारतात आहेत. '
Web Title: Pakistani Weightlifter Nooh Dastagir Butt Says He Is A Big Fan Of Mirabai Chanu Got A Lot Of Love From India
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..