Cyclone Tauktae: वानखेडेनंतर मोदी स्टेडियमवर घोंगावतय संकट

या चक्रीवादळाच्या तडाख्याचा क्रिकेटलाही फटका बसलाय.
Cyclone Tauktae wankhede stadium
Cyclone Tauktae wankhede stadium e sakal

तौक्ते चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) निसर्ग चक्री वादळाच्या (Nisarg cyclone) कटू आणि भयानक आठवणींना उजाळा दिलाय. महाराष्ट्रात पाणी-पाणी करणाऱ्या या वादळ आता गुजरातच्या दिशेने पुढे सरकले आहे. मुंबईत 90 किलो प्रति तास वेगाने धडकलेल्या वादळाने मोठे नुकसान झाले. शहरातील अनेक घरांना याचा फटका बसला. या चक्रीवादळाच्या तडाख्याचा क्रिकेटलाही फटका बसलाय.

भारतीय संघाचे कोच रवि शास्त्री (Ravi Shastri) यांनी तौक्ते चक्रीवादळाचे आपल्या शब्दात वर्णन केले आहे. चक्रीवादळ पाहून चक्रावून गेलो होतो. मुंबईत या वादळामुळे मोठे नुकसान झाले. वादळ खतरनाक असते. ते अजूनही थांबलेले नाही. याचा मोठा फटका बसू नये, अशी आशा करुयात, अशा आशयाचे ट्विट रवि शास्त्री यांनी केले आहे.

Cyclone Tauktae wankhede stadium
टीम इंडियाला दिलासा, साहाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

वानखेडे स्टेडियमवरील साइटस्क्रीन कोसळली

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत अनेक ठिकाणी नुकसान झाले. मुंबईतील वानखेडे स्टेडियमलाही या वादळाचा फटका बसला. वानखेडेच्या मैदानात उभारलेली 16 फुटाची साइट स्क्रीन कोसळली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या वृत्तानुसार, नॉर्थ स्टँडजवळ उभारलेली साइटस्क्रीन जोरदार वाऱ्यामुळे कोसळलीये. साइटस्क्रीन कोसळण्याची ही पहिली वेळ नाही. 2011 च्या वर्ल्डकप दरम्यानही वानखेडेच्या मैदानातील साइट स्क्रीन कोसळली होती.

Cyclone Tauktae wankhede stadium
ऑलिम्पिक विजेत्या सुशील कुमारवर 1 लाखाचं बक्षीस

नरेंद्र मोदी स्टेडियमवरही घोंगावतय संकट

मुंबईचे संकट आता टळले असून तौक्ते चक्रीवादळाचा प्रवास हा गुजरातच्या दिशेने सुरु आहे. अहमदाबादमध्ये तयार करण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आता या वादळाचे संकट घोंगावत आहे. मुंबईपेक्षा दुप्पट वेगाने अहमदाबादमध्ये वादळ धडकणार असल्यामुळे अहदाबादच्या स्टेडियमचेही नुकसान होऊ शकते. गुजरातच्या किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग 150 किमी ते 175 किमी प्रति तास इतका असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com