
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा खेळाडू डी गुकेश हा विजेता ठरला आहे. गुकेशने महाअंतिम सामन्यात चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेन याला चेकमेट केलं. ही स्पर्धा जिंकणारा डी गुकेश हा विश्वनाथन आनंद यांच्यानंतर भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला आहे. यानंतर गुकेशची बाहेर वाट पाहत असलेल्या त्याच्या वडिलांनी पहिल्यांदा त्याला मिठी मारली, यावेळी गुकेश अत्यंत भावूक झाला होता.