WWE : हजारो फॅन्ससमोर तिनं त्याच्याकडे मागितला घटस्फोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

(WWE 24/7 Champion Dana Brooke Want Divorce From Reggie

WWE : हजारो फॅन्ससमोर तिनं त्याच्याकडे मागितला घटस्फोट

WWE Raw मध्ये या आठवड्यात खूप धोखे पाहायला मिळाले. रेगीने या आठवड्यात त्याची ऑन-स्क्रीन पत्नी डैना ब्रूकला (Dana Brooke) धोखा दिला आहे. तिच्याकडून 24/7 चॅम्पियनशिप जिंकण्याचा प्रयत्न केला. यामुळे डैना ब्रूक संतापला आणि रेगीला कानाखाली मारली. कानाखाली मारल्यानंतर हजारो चाहत्यांसमोर डैना ब्रूकने रेगीकडे घटस्फोटाची मागणी केली.(WWE 24/7 Champion Dana Brooke Want Divorce From Reggie)

हेही वाचा: Womens Cricket : 'BCCI'च्या शिबिरासाठी ईश्वरी सावकारची निवड

डैना ब्रूकच्या घटस्फोट मागणी नंतर रेगी तिच्या गुडघ्यावर बसून माफी मागत होता. त्या वादा नंतर डैना तिथून निघून गेली. असं पाहिले तर रेगी आणि डैना ब्रूकने ऑन-स्क्रीन लग्नाला जास्त दिवस झाले नाही. रेगी आणि डैना ब्रूक खरोखर घटस्फोट घेणार आहेत की नाही हे पाहणे मनोरंजक असेल. आर-ट्रुथने या आठवड्यात Raw वर रेगीला डैना ब्रूक घटस्फोट देण्यास तयार झाली होती.

हेही वाचा: पाकिस्तानचा असा खेळाडू जो कधीच काढत नाही मुलींसोबत फोटो

WWE Raw मध्ये रेगी, टमीना, अकीरा टोजावा आणि डैना ब्रूक यांच्यात बॅकस्टेजला भांडणं पाहायला मिळाली. यानंतर डैना ब्रूकने रेगीला विचारून निक्की A.S.H विरुद्ध रीमॅच बुक केली होती. या सामन्यात निक्की A.S.H ला पराभूत करून डैना ब्रूक पुन्हा 24/7 चॅम्पियन बनण्यात यशस्वी ठरली. या सामन्यानंतरच रेगीने इतर सुपरस्टार्ससह डैना ब्रूकला 24/7 चॅम्पियन बनवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर डैना ब्रूकने रेगीकडून घटस्फोटाची मागणी केली. ब्रूकने रेगीकडून घटस्फोट मागितला असल्याने, घटस्फोटाच्या या भागात काय घडते हे पाहणे मनोरंजक असेल.

Web Title: Dana Brooke Wwe 24 7 Champion Want Divorce From Reggie

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :DivorceWWEDivorce Cases
go to top