
पाकिस्तानचा असा खेळाडू जो कधीच काढत नाही मुलींसोबत फोटो
पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत आहेत. रिझवानचा पाकिस्तान टीव्हीवरील इंटरव्यू सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. इंटरव्यूमध्ये त्याला विचारण्यात आल कि अनेकदा तू मुलींपासून अंतर ठेवताना दिसतो का? तू इतका लाजाळू का आहात? मुलींनपासून लांब लांब का पळतो?. या प्रश्नाला अतिशय नम्रपणे उत्तर देताना रिझवान म्हणाला की, हे बघ मला काय लाजायची गरज नाही, पण काही वैयक्तिक गोष्टी आहे.
हेही वाचा: Oops! रन वाचवायला गेला पण पँट सुटली; IPL सामन्यातला VIDEO व्हायरल
मला मुलींबद्दल खूप आदर आहे. मी स्वत:ला काय लाजाळू समजत नाही. मी माझ्या बहिणी आणि आई सोबत फोटो काढतो. त्यांचा स्थान माझ्या मनात खूप वरचा आहे. त्यामळे मी इतर कोणत्या मुलीसोबत फोटो काढण्या इतका सक्षम नाही. त्याचवेळी मोहम्मद रिझवानशी संबंधित एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
हेही वाचा: बाप देशासाठी खेळू शकला नाही, पण वडगाव मावळची लेक बनली वर्ल्ड चॅम्पियन
मोहम्मद रिझवान सध्या इंग्लंडमध्ये ससेक्सकडून काउंटी क्रिकेट खेळत आहे. डरहमविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या डावात रिझवान आणि पुजारा यांनी सहाव्या विकेटसाठी 154 धावांची संस्मरणीय भागीदारी करून ससेक्सला मजबूत स्थितीत आणले. या सामन्यात रिझवानचा एक अप्रतिम झेलही घेतला. हवेत उडत रिझवानने हा शानदार झेल टिपला त्याची चर्चेत होता.
Web Title: Pakistan Player Mohammad Rizwan Why Not Take Photos With Girls Shaheen Afridi Reaction Cricket News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..