Mohammad Rizwan : परमेश्वर क्रूरतेला पाठिंबा देत नाही... दानिश कनेरियाने रिझवानला दिला घरचा आहेर

Mohammad Rizwan Danish Kaneria
Mohammad Rizwan Danish Kaneriaesakal

Mohammad Rizwan Danish Kaneria : भारताने पाकिस्तानचा 7 विकेट्स आणि 19.3 षटके राखून पराभव करत वर्ल्डकपमधील आपली विजयी घोडदौर सुरूच ठेवली. दरम्यान, पाकिस्तानने 2 बाद 155 धावा करत दमदार सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर त्यांचा डाव गडगडला अन् 191 धावात संपुष्टात आला. भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 36 धावात पाकिस्तानाचे 8 फलंदाज तंबूत धाडले. यात सेट झालेला बाबर आझम (50) आणि मोहम्मद रिझवान (49) यांचा देखील समावेश होता.

Mohammad Rizwan Danish Kaneria
ENG vs AFG : 6, 6, 6, 6... गुरबाज गरजला! गतविजेत्या इंग्लंडला अफगाणिस्तानच्या सलामीवीरांनी चांगलंच पळवलं

पाकिस्तानच्या या मोठ्या पराभवानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. यात आता पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने देखील उडी घेतली असून त्याने थेट मोहम्मद रिझवानला चिमटा काढला. कनेरियाने रिझवानच्या पॅलेस्टिनला समर्थन करण्याच्या वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

दानिश कनेरियाने टीका केली की, 'पुढच्या वेळी तुझा विजय हा मानवतेला समर्पित कर. परमेश्वर क्रूरतेला कधीही पाठिंबा देत नाही.'

मोहम्मद रिझवानने श्रीलंकेविरूद्धचे आपले झुंजार शतक हे गाझा पट्टीतील लोकांना समप्रित केले होते. सध्या गाझा पट्टी ही युद्धभूमीत बदलली असून गाझा पट्टीवर नियंत्रण असलेल्या हमासने इस्रइलवर क्षेपणास्त्रांचा हल्ला चढवला होता. या हल्ल्यात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला होता. यानंतर इस्राइलने प्रत्युत्तर देत गाझा पट्टीत एअर स्ट्राईक करण्यास सुरूवात केली.

Mohammad Rizwan Danish Kaneria
India Vs Pakistan:'जर तुम्हाला जिंकता नसेल तर...',पाकिस्तानच्या दिग्गजाकडून बाबरची खरडपट्टी

भारताने पाकिस्तानचा वनडे वर्ल्डकमधील आठवा पराभव करत आपली विजयी परंपरा कायम राखली. पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 192 धावांचे आव्हान 30.3 षटकात पार केले. भारताचा कर्णधार रोहित शर्माने 63 चेंडूत 86 धावा चोपल्या. तर श्रेयस अय्यरने नाबाद 53 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 2 तर हसन अलीने 1 विकेट घेतली.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com