T20 WC : 'हे तर टरबूजा सारखे दिसतात...' पाकिस्तानी क्रिकेटपटूने जर्सीची उडवली खिल्ली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

danish kaneria trolls pakistan team t20 world cup jersey

T20 WC : 'हे तर टरबूजा सारखे दिसतात...' पाकिस्तानी क्रिकेटपटूने जर्सीची उडवली खिल्ली

Pakistan Team T20 World Cup Jersey : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आगामी T20 विश्वचषकासाठी आपल्या संघाची नवीन जर्सी लाँच केली आहे. सोशल मीडियावर लोक पीसीबीच्या नव्या जर्सीची खिल्ली उडवत आहेत. यामध्ये पाकिस्तानचा माजी लेग-स्पिनर दानिश कनेरियाचा समावेश आहे, जो नवीन जर्सीची तुलना टरबूज आणि फळांच्या दुकानाशी करत आहे.

हेही वाचा: T20 World Cup : रोहित शर्माला शोधावी लागणार 'या' प्रश्नांची उत्तरे, आता फक्त...

पीसीबीने T20 विश्वचषकासाठी दोन नवीन जर्सी लाँच केल्या आहेत. दोन्ही जर्सीची रचना सारखी असली तरी रंग भिन्न आहे. दानिश कनेरियाने जर्सीच्या डिझाईनवरून पीसीबीला जोरदार ट्रोल केले आहे. कनेरियाने त्याच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला आणि म्हटले, गडद हिरवा असावा. ही जर्सी टरबुजासारखी दिसत. फळांच्या दुकानात खेळाडू उभे असल्याचे वाटत आहे. दानिश कनेरियाने भारतीय संघाच्या जर्सीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. टीम इंडियाच्या जर्सीचा रंग गडद निळा असायला हवा, असं कनेरियाने म्हटलं आहे. गडद निळा रंग ताकदीची अनुभूती देतो असं कनेरियाचं मत आहे.

हेही वाचा: Ind vs Aus : टीम इंडिया नाही जिंकणार टी-20 मालिका? नागपुरातून आली वाईट बातमी

आगामी विश्वचषकासाठी पाकिस्तानने गुरुवारी त्यांचा संघ जाहीर केला. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघात आशिया कप खेळणाऱ्या संघातील अनेक खेळाडू आहेत. शादाब खानला बाबरचा उपकर्णधार करण्यात आले आहे, तर शाहीन शाह आफ्रिदीला संघात ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानची गोलंदाजी मजबूत दिसत आहे. आफ्रिदीशिवाय त्यात नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन यांचा समावेश आहे. शाहनवाज डहानी यांचे नाव राखीव ठेवण्यात आले आहे.

16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक होणार आहे. पाकिस्तानचा संघ 23 ऑक्टोबरला भारताविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. या सामन्याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title: Danish Kaneria Troll Pakistan Team T20 World Cup Jersey Calls It Fruit Shop Cricket News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..