सुपरस्टार आर माधवनच्या मुलाने देशाची मान उंचावली, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक |R Madhavan Son News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

R Madhavan Son News

सुपरस्टार आर माधवनच्या मुलाने देशाची मान उंचावली, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक

नवी दिल्ली : सुपरस्टार आर माधवनचा मुलगा वेदांत माधवनने कोपेनहेगन मध्ये कमाल केले आहे. जलतरणपटू वेदांतने डॅनिश ओपनमध्ये पुरुषांच्या 800 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक पटकवले आहे. 16 वर्षीय वेदांतने सर्वोत्तम कामगिरी केली आणि 8.17.28 अशी वेळ नोंदवली. त्याने स्थानिक जलतरणपटू अलेक्झांडर एल. ब्योर्नचा 0.10 सेकंदांच्या फरकाने पराभव केला.

वेदांतने या स्पर्धेत भलेही सुवर्णपदक जिंकले असेल, पण तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला खूप सुधारणा करण्याची गरज आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अमेरिकेच्या रॉबर्ट फिन्केने 7.41.87 अशी वेळ नोंदवली. जागतिक विक्रम 7.32.12 आहे.(R Madhavan Son News)

अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत त्यांच्यात बरीच सुधारणा करत आहे. टूर्नामेंटनुसार त्याच्या कामगिरीत चांगली सुधारणा होत आहे. यापूर्वी त्याने 1500 मीटर फ्रीस्टाईलमध्ये रौप्य पदक जिंकले आहे.

भारतीय अनुभवी जलतरणपटू साजन प्रकाशने पुरुषांच्या 100 मीटर बटरफ्लाय ए फायनलमध्ये 54.24 सेकंद वेळेसह पाचवे स्थान पटकावले आहे. तर तनिश जॉर्ज मॅथ्यू सीने 56.44 गुणांसह अंतिम फेरी गाठली आहे. हीट्समधील शीर्ष 8 जलतरणपटू A अंतिम फेरीसाठी पात्र झाला आहे. पुढील आठ B मध्ये उतरणार आणि पुढील आठ C मध्ये उतरत आहे. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत 2 सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले आहे.

Web Title: Danish Open Swimming R Madhavan Son Vedaant Madhavan Wins Gold Medal Sports News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :r madhavanswimmingmedals
go to top