डॅरेन सॅमीला मिळाला पाक सरकारचा 'सितारा - ए - इम्तियाज' पुरस्कार

Daren Sammy got Pakistan Civil Award Sitara-e-Imtiaz
Daren Sammy got Pakistan Civil Award Sitara-e-Imtiaz esakal

इस्लामाबाद : वेस्ट इंडीजला 2016 मध्ये टी 20 वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या माजी कर्णधार डॅरेन सॅमीचा (Daren Sammy) पाकिस्तान सरकारने 'सितारा - ए - इम्तियाज' (Sitara-e-Imtiaz) हा पुरस्कार देऊन गौरव केला. सध्या सोशल मीडियावर डॅरेन सॅमीचा पुरस्कार घेतानाचा फोटो शेअर होत आहे. पाकिस्तान (Pakistan) सरकारकडून साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान आणि संशोधन या क्षेत्रात मोठी कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो.

डॅरेन सॅमी हा गेल्या काही काळापासून पाकिस्तान क्रिकेटशी जोडला गेला आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये (Pakistan Super League) त्याने पेशावर जाल्मी संघाचा कर्णधार आणि कोच देखील आहे. याचबरोबर डॅरेन सॅमीने पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन पुन्हा व्हावे यासाठी बरेच प्रयत्न केले होते. यामुळेच सॅमीला 'सितारा - ए - इम्तियाज' पुरस्कार देण्यात आला.

Daren Sammy got Pakistan Civil Award Sitara-e-Imtiaz
गुजरातच्या विजयावर 2011 च्या वर्ल्डकप फायलनची छाप

डॅरेन सॅमीने पुरस्कार मिळाल्यानंतर सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर करत 'सितारा - ए - इम्तियाज' पुरस्कार मिळने हा माझ्या दृष्टीने गौरवशाली क्षण आहे. सॅमी आपल्या इन्स्टाग्रावर लिहितो की, 'क्रिकेटमुळे मी संपूर्ण जगाचा प्रवास करू शकलो. यात काही उत्तम ठिकाणी मला खेळण्याचा अनुभव मिळाला. पाकिस्तान अशाच उत्तम ठिकाणांपैकी एक आहे. या ठिकाणी मला घरीच असल्याची भावना निर्माण होते. पाकिस्तान सरकार आणि तेथील लोकांकडून हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळणे ही सन्मानाची गोष्ट आहे.'

Daren Sammy got Pakistan Civil Award Sitara-e-Imtiaz
IPL 2022: पराभवानंतरही राजस्थान रॉयल्सवर पडतोय पैशांचा पाऊस

वेस्ट इंडीजच्या या माजी कर्णधाराने आपल्या कारकिर्दित 38 कसोटी सामने, 126 एकदिवसीय आणि 68 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या त्याने एका शतकासह 1323 कसोटी, तर वनडेत 9 अर्धशतके ठोकली आहेत. टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने 587 धावा केल्या आहेत. सॅमी ही वेस्ट इंडीजचा एक अष्टपैलू खेळाडू होता. त्याने नवडेत 81 कसोटीत 84 तर टी 20 क्रिकेटमध्ये 44 विकेट घेतल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com