IPL 2022: पराभवानंतरही राजस्थान रॉयल्सवर पडतोय पैशांचा पाऊस

गुजरात टायटन्स संघाला 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली तर...
IPL 2022 Final GT vs RR
IPL 2022 Final GT vs RR

IPL 2022 Final GT vs RR: आयपीएल ही जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामाचा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. गुजरात टायटन्सने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरातने राजस्थानचा 7 गडी राखून पराभव करत ट्रॉफी जिंकली.(Champions Gujarat Titans runner up rajasthan royals amount prize)

IPL 2022 Final GT vs RR
मी इतकी मेहनत का केली...विजयानंतर कॅप्टन पांड्या म्हणाला

गुजरातच्या विजयानंतर बीसीसीआयने संघावर पैशांचा पाऊस पाडला आहे. हार्दिक पांड्याचा कर्णधार गुजरात टायटन्स संघाला 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राजस्थान रॉयल्सला 12.5 कोटी रुपये मिळाले आहे. तिसऱ्या स्थानावर आरसीबी सात कोटी रुपये तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या लखनौ सुपर जायंट्सला 6.5 कोटी रुपये मिळाले आहे.

आयपीएलच्या या हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही भरपूर पैसे मिळाले आहे. या हंगामात राजस्थानच्या युजवेंद्र चहलने सर्वाधिक 27 विकेट घेतल्या तर 10 लाख रुपये मिळाले. त्याचवेळी हंगामात सर्वाधिक धावा करणारा राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरला ऑरेंज कॅपसह १० लाख रुपये मिळाले. बटलरने 17 सामन्यात 863 धावा केल्या आहे.

IPL 2022 Final GT vs RR
'कुछ तो बात है उसमे' फक्त कागद आणि पेन वापरून गुजरात टायटन्सला जिंकून दिलं

अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाले तर राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमावून 130 धावा केल्या. त्याच्याकडून जोस बटलरने सर्वाधिक 39 धावा केल्या. गुजरातकडून कर्णधार हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी करताना 3 बळी घेतले. त्याने 4 षटकात केवळ 17 धावा दिल्या. गुजरातने 131 धावांचे लक्ष्य 18.1 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले. सलामीवीर शुभमन गिल ४५ आणि डेव्हिड मिलर ३२ धावांवर नाबाद राहिले. हार्दिकने 30 चेंडूत 34 धावा केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com