क्रिकेटविश्वात भूकंप, कसोटी मालिका संपताच हा कर्णधार पदावरून होणार पायउतार?

Darren Berry On Pat Cummins
Darren Berry On Pat Cummins

Darren Berry On Pat Cummins : भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. दुसरीकडे 2023 च्या अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने आहेत. ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. मात्र चौथ्या कसोटीत इंग्लंडचा संघ मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, एका माजी दिग्गज खेळाडूने धक्कादायक दावा केला आहे. एका संघाचा कर्णधार लवकरच कर्णधारपद सोडणार असल्याचा दावा या दिग्गज खेळाडूने केला आहे.

Darren Berry On Pat Cummins
Team India: रोहित-हार्दिक नाही तर 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा कर्णधार! धक्कादायक अपडेट आले समोर

ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत क्रिकेटचे माजी दिग्गज आणि आता समालोचक डॅरेन बेरी यांच्या एका विधानाने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स लवकरच कर्णधारपद सोडणार असल्याचा दावा डॅरेन बेरीने केला आहे. डॅरेन बेरीने एका ट्विटमध्ये हा दावा केला आहे. पॅट कमिन्सने अलीकडेच त्याच्या नेतृत्वाखाली प्रथमच ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवून दिले.

Darren Berry On Pat Cummins
Wi vs Ind : कोहलीला भेटल्यानंतर 'या' खेळाडूची आई लागली रडायला, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक

डॅरेन बेरीने ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मर्व्ह ह्यूजला प्रत्युत्तर देत लिहिले, मी अंथरुणावर आहे, पण झोप येत नाही. पॅट कमिन्स हा एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे यात शंका नाही पण हा संदेश लक्षात ठेवा. अॅशेस मालिकेनंतर तो कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे. प्रश्न असा आहे की तो स्मिथकडे परत जाईल की हेड किंवा मार्शकडे जाईल?

Darren Berry On Pat Cummins
IND vs BAN : आशिया कपमध्ये भारत अन् बांगलादेशचे खेळाडू चालू सामन्यात मैदानावर भिडले अन्... Video

अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे चार विकेट्स घेत इंग्लंडने सामन्यावर वर्चस्व राखले आहे. इंग्लंडने पहिला डाव 592 धावांवर संपवला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 275 धावांची आघाडी घेतली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात चार गडी गमावून 113 धावा केल्या होत्या आणि इंग्लंड 162 धावांनी पिछाडीवर होते. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 317 धावांवर आटोपला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com