डेव्हिड वॉर्नरचे क्रिकेट मैदानावर धडाकेबाज पुनरागमन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

नवी दिल्ली : चेंडू कुरतडण्याच्या आरोपाखाली एक वर्षाची बंदी असलेला ऑस्ट्रेलियाचा माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरने तडाखेबाज फलंदाजी करत मैदानावर पुनरागमन केले. ब्रिस्बेनच्या एलन बॉर्डर ओवल मैदानावर ऑस्ट्रेलिया नॅशनल हाय परफॉर्मंस टीमच्या विरुद्ध टी-20 सराव सामन्यात त्याने शतक झळकावले, ज्यात त्याने तब्बल 20 षटकार खेचले. 

वॉर्नरच्या फलंदाजीचा तडाखा एवढा जबरदस्त होता की त्याने केलेल्या 130 धावांपैकी 120 धावा त्याने फक्त षटकार मारुनच केल्या. त्याची फलंदाजी पाहता तो दोन महिने खेळापासून दूर होता असे अजिबात वाटत नसल्याचे ऑस्ट्रेलियाच्या बातम्यांमध्ये सांगण्यात आले. सामन्यानंतर त्याने प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंशी संवाद साधला तसेच युवा खेळाडूंना सूचनाही दिल्या. वॉर्नर यानंतर कॅनडामध्ये होणाऱ्या ग्लोबल टी-20 लीगमध्ये खेळणार आहे. याच स्पर्धेत वॉर्नर सोबत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथही सहभागी होणार आहे. याशिवाय वॉर्नर कॅरेबियन प्रिमियर लीगमध्येसुद्धा भाग घेणार आहे. 

Web Title: david warner come back on cricket ground