David Warner : पुन्हा वॉर्नरच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

David Warner Likely To be Named As Australia ODI Captain

David Warner : पुन्हा वॉर्नरच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ?

David Warner Australia ODI Captain : ऑस्ट्रेलियाचा वनडे कॅप्टन अॅरोन फिंचने नुकतीच वनडे क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली. फिंचने वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व एप्रिल 2019 पासून हातात घेतले होते. आता तो न्यूझीलंडविरूद्धला 3 - 0 असा व्हाईट वॉश दिल्यानंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. तो पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियातच होणाऱ्या आयसीसी टी 20 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे. दरम्यान, फिंचनंतर आता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कोण होणार अशी चर्चा सुरू आहे. यात स्टीव्ह स्मिथ, पॅट कमिन्स आणि डेव्हिड वॉर्नर यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र फिंचने आपली पहिली पसंती ही डेव्हिड वॉर्नरला दिली आहे.

हेही वाचा: Veda Krishnamurthy : भारताची महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्तीला रणजीपटूने केले प्रपोज

फिंचला ज्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघाचे नेतृत्व डेव्हिड वॉर्नरने केले तर तुला आवडेल का असे विचारण्यात आले त्यावेळी त्याने 'मला असे वाटते की हा विषय क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अख्त्यारित येतो. काही काळापूर्वी मी त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाकडून खेळलो आहे. त्याला कर्णधार होण्याची संधी मिळाली होती. तो खूप चांगला कर्णधार आहे. तो एका चांगला रणनितीकार कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळायला खेळाडूंना आवडेल.' फिंचने ही प्रतिक्रिया ट्रिपल एम या रेडिओ चॅनलवर बोलताना दिली.

हेही वाचा: Asia Cup 2022 : लंकेच्या विजयासाठी धोनीच्या CSK ने देखील लावला हातभार!

मात्र फिंच पुढे असंही म्हणाली की, मला शंभर टक्के खात्री नाही की क्रिकेट ऑस्ट्रेलिया वॉर्नरबाबत घेतलाला आपला निर्णय बदलेल. दरम्यान, फिंचला कसोटी कर्णधार पॅट कमिन्सकडे वनडेचे नेतृत्व देण्याबाबत विचारले असता त्याने 'एका वेगवान गोलंदाजाला दोन्ही क्रिकेट फॉरमॅटमध्ये नेतृत्व करणे अवघड जाते. जर कोणी हे दोन्ही सांभळू शकतो तो फक्त पॅट कमिन्स आहे.'

Web Title: David Warner Likely To Be Named As Australia Odi Captain After Aaron Finch Retirement

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..