IPL 2019 : वॉर्नर परतला अन् मैदानात बरसला

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 मार्च 2019

गेल्या वर्षी वॉर्नरला बंदीमुळे आयपीएलमध्ये खेळू शकले नव्हते. आगामी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी वॉर्नर उत्सुक आहे. 

आयपीएल 2019 : नवी दिल्ली : चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणातील बंदी उठल्यानंतर आयपीएलसाठी सज्ज झालेल्या डेव्हिड वॉर्नरने सोमवारी सराव सामन्यात खेळताना 43 चेंडूंत 65 धावा केल्या. वॉर्नर सनरायझर्स हैदराबादकडून खेळत असून, त्याने आपल्याच फ्रॅंचाइजीच्या 'ब' संघाविरुद्ध फलंदाजीचा सराव केला. गेल्या वर्षी वॉर्नरला बंदीमुळे आयपीएलमध्ये खेळू शकले नव्हते. आगामी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी वॉर्नर उत्सुक आहे. 

यंदाच्या आयपीएलच्या मोसमाला 23 मार्चला सुरवात होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना चेन्न्ई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात होणार आहे. हा सामना अत्यंत हायव्होल्टेज होणार आहे. 

हैदराबादचा पहिला सामना दुसऱ्या दिवशी 24 मार्चला होणार आहे. त्यांचा पहिला सामना कोलकता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: David Warner makes a stunning comeback in practice match

टॅग्स