मालिका विजय अन् अर्धशतकी खेळी.. डेव्हिड वॉर्नरचा कसोटी क्रिकेटला शानदार गुडबाय !

तिसराही सामना जिंकून ऑस्ट्रेलियाचा पाकला व्हाईटवॉश
cricket
cricketsakal

सिडनी : ऑस्ट्रेलिया विजय आणि पाकिस्तानला व्हाईटवॉश आणि स्वतःचे शानदार अर्धशतक असा त्रिवेणी संगम साधत डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटला गुडबाय केले. ऑस्ट्रेलियाने तिसरा सामना आठ विकेटने जिंकला; तर आपल्या अखेरच्या डावात वॉर्नरने ५७ धावांची खेळी साकारली. सिडनी क्रिकेट ग्राऊंड या आपल्या घरच्या मैदानावर झालेला हा सामना वॉर्नरसाठी अविस्मरणीय ठरला. पाकिस्तानचे उर्वरित फलंदाज बाद करून त्यांचा डाव ११५ धावांत गुंडाळला. विजयासाठी असलेले १३० धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने २५.५ षटकांतच पूर्ण केले.

सलामीचा साथीदार उस्मान ख्वाजा शून्यावर बाद झाल्यावर सर्वांचे लक्ष वॉर्नरवर केंद्रित झाले होते. ७५ चेंडूंत त्याने सात चौकारांसह ५७ धावांची खेळी सजवली आणि लाबूशेनसह ११९ धावांची भागीदारी करून संघाचा विजय निश्चित केला.

वॉर्नरची कसोटी कारकीर्द

सामने ः ११२. डाव ः २०५. धावा ः ८,७८६. सर्वोच्च ३३५*. सरासरी ः ४४.५९. शतके ः २६. अर्धशतके ः ३७. चौकार ः १०३६. षटकार ः ६९.

संक्षिप्त धावफलक ः पाकिस्तान पहिला डाव ः ३१३ आणि दुसरा डाव ः ११५ (सायिम अयुब ३३, बाबर आझम २३, मोहम्मद रिझवान २८, जोश हेझलवूड ९-२-१६-४, मिचेल स्टार्क ४-१-१५-१, पॅट कमिन्स ७-०-२४-१, नॅथन लायन १७.१-२-३६-२).

ऑस्ट्रेलिया, पहिला डाव ः २९९ आणि दुसरा डाव ः २५.५ षटकांत २ बाद १३० (डेव्हिड वॉर्नर ५७, मार्नस लाबूशेन ६२, साजिद खान ११-१-४९-२)

टीव्ही पंचांकडून बाद

वॉर्नर पायचीत असलेला निर्णय टीव्ही पंचांनी दिला. साजिद खानचा चेंडू वॉर्नरच्या पॅडवर लागला मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद ठरवले. पाक खेळाडूंनी डीआरएसचा वापर केला. त्यात वॉर्नर बाद असल्याचे स्पष्ट झाले. तेथेच वॉर्नरच्या ११२ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीची सांगता झाली. पाकच्या सर्वच खेळाडूंनी लगेचच वॉर्नरशी हस्तांदोलन करत त्याला मानवंदना दिली.

स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले : वॉर्नर

सिडनी : स्वप्न प्रत्यक्षात साकार व्हावे, असा हा क्षण होता. संघाचे ३-० असे निर्भेळ यश... गेल्या २ वर्षांचा काळ फारच सुखावणारा होता. कसोटी अजिंक्यपद, अॅशेस मालिकेतील बरोबरी, विश्वकरंडकांतील विजेतेपद... ऑस्ट्रेलिया संघाच्या या सुवर्णकाळाचा मी साक्षीदार राहिलो, याचा अभिमान आहे, अशी भावना वॉर्नरने निवृत्तीच्या वेळी व्यक्त केली.

वॉर्नर म्हणतो, संघातील या सर्व साथीदारांचा अभिमान आहे. हे सर्व जण माझ्यासाठी स्फूर्तिस्थान राहिले. तीन वेगवान गोलंदाज आणि त्यांच्या साथीला मिचेल मार्श, आम्ही सर्व जण जिम असो वा मैदान, प्रचंड मेहनत घेत होतो अर्थात त्याला सपोर्ट स्टाफ आणि फिजिओ यांचे सहकार्य अनन्यसाधारण होते. जेव्हा पाठी वळून पाहतो तेव्हा सर्वच अविस्मरणीय वाटते. ‘‘आता या सर्वांची साथ असणार नाही किंवा त्यांचा सामना नेटमध्ये करावा लागणार नाही. असे असले, तरी कोणतेही दुःख नसेल. उद्याचा दिवस नेहमीप्रमाणेच सुरू होईल आणि आनंद तसेच अभिमानाने नव्या दिवसाची सुरुवात करेन.’’

कसोटी क्रिकेटच्या या प्रवासात घरच्या प्रेक्षकांनी दिलेला पाठिंबा अफलातून होता. आभार मानण्याच्याही पलिकडचे असे त्यांचे प्रेम आहे. या अंतिम सामन्यासाठी तुमची उपस्थिती आणि मला दिलेले प्रोत्सहन कधीही विसरू शकत नाही. क्रिकेटमधील या प्रवासात कुटुंबाचा वाटा सर्वाधिक आहे. आई-वडिलांपासून ते मुलींपर्यंत सर्व जण माझ्या आयुष्याचे महत्त्वाचे घटक आहेत... असे सांगत वॉर्नने आपली भावना शब्दबद्ध केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com