David Warner Retirement : खूप सारं प्रेम डेव्हिड... पत्नीची इन्स्टाग्राम गूढ पोस्ट, वॉर्नर झाला निवृत्त?

Candice Warner Instagram Post : लीड्स येथील तिसरी कसोटी संपल्यानंतर डेव्हिड वॉर्नरची पत्नी कँडीसने इन्स्टाग्रामवर एक गूढ पोस्ट केली.
David Warner Retirement
David Warner Retirementesakal

Cricket News : ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची ही शेवटची अ‍ॅशेस मालिका असण्याची शक्यता आहे. अ‍ॅशेस मालिकेतील तीन कसोटी सामन्यात वॉर्नरने अर्धशतकी खेळी केल्या मात्र त्याला मोठी खेळी करण्यात अपयश येत आहे. यानंतर कसोटी संघातील त्याच्या स्थानावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, वॉर्नर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेईल अशी देखील चर्चा आहे.

लीड्स येथील तिसरी कसोटी संपल्यानंतर डेव्हिड वॉर्नरची पत्नी कँडीसने (Candice Warner) इन्स्टाग्रामवर एक गूढ पोस्ट केली. यावरून कँडीसचा पती वॉर्नरची कसोटी कारकीर्द संपल्यात जमा असल्याचा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत. डेव्हिड वॉर्नरने कसोटीमधून निवृत्ती घेण्याबाबत अजून काही स्पष्ट केलेले नाही. (David Warner Wife)

David Warner Retirement
World Cup India Vs Pakistan : काय खरं नाही! ते पत्र पाठवून पीसीबीनं माती खाल्ली; पाक सरकार जाम भडकलं

कँडीसने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊटवरून वॉर्नर फॅमलीचा फोटो पोस्ट केला. याला तिने 'कसोटी क्रिकेटसाठी दौरा करण्याचा काळ आता संपला आहे. खूप मजा आली. तुझे कायमचे मोठे समर्थक आणि तुझी मुलींची गँग. खूप सारं प्रेम डेव्हिड वॉर्नर.'

लीड्समधील तिसरी कसोटी झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिनसने डेव्हिड वॉर्नरच्या संघातील स्थानाबाबत शाश्वती देण्यास नकार दिला. पत्रकार परिषदेत कमिन्सने कॅमरून ग्रीन मँटेस्टर कसोटीसाठी संघात परतणार असल्याचे संकेत दिले.

David Warner Retirement
Ben Stokes MS Dhoni : सीएसकेच्या 'भावी' कर्णधाराचा धोनीलाच धोबीपछाड; तिसऱ्या अ‍ॅशेस कसोटीत असं काय घडलं?

कमिन्स माध्यमांशी बोलताना म्हणाला की, 'तुम्ही सर्व पर्याय खुले ठेवता. आमच्याकडे अजून 9 ते 10 दिवस आहेत. आम्ही एक दीर्घ श्वास घेणार, आम्ही काही दिवस ब्रेक घेणार आहे. ग्रीन हा मँचेस्टर कसोटीसाठी फिट झाला आहे. जॉश हेजलवूड देखील परत आला आहे. आता आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. आम्ही खेळपट्टी पाहू आणि चर्चा करून बेस्ट प्लेईंग 11 निवडू.' (Ashes Seires 4th Test Austalia Playing 11)

मिचेल मार्शने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात शतकी खेळी केल्याने त्याचे संघातील स्थान पक्के झाले आहे. जर ग्रीन संघात परतणार असेल तर डेव्हिड वॉर्नरला प्लेईंग 11 मधील जागा गमावावी लागेल.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com