VIDEO : दीपकलाही दिप्ती होता आलं असतं! मात्र दाखवली उदारता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak Chahar Have Chance To Run Out South African Non Striker Batsmen Like Deepti Sharma

VIDEO : दीपकलाही दिप्ती होता आलं असतं! मात्र दाखवली उदारता

India Vs South Africa 3rd T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 49 धावांनी पराभव करत मालिकेचा शेवट गोड केला. भारताने मालिका 2 - 1 अशी जिंकली. दरम्यान, दीपक चाहरने भारताची अवस्था 8 बाद 120 धावा झाली असताना 17 चेंडूत 31 धावांची आक्रमक खेळी करत भारताची मोठा पराभव होण्यापासून सुटका केली. बॅटिंगप्रमाणे गोलंदाजी दीपकला फारशी चमक दाखवता आली नसली तरी त्याने दाखवलेल्या उदारवृत्तीची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. (Deepak Chahar Have Chance To Run Out South African Non Striker Batsmen Like Deepti Sharma)

हेही वाचा: Dinesh Karthik : पंत - डीकेचे प्रमोशन; धमाक्यात सुरूवात मात्र शेवट कडूच!

दीपक चाहर ज्यावेळी 16 वे षटक टाकण्यासाठी आला त्यावेळी पहिलाच चेंडू टाकताना दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज स्टब्ज बॉल टाकण्याच्या आधीच क्रीज सोडून पुढे जाताना दिला. दीपक चाहरने देखील चलाखीने चेंडू न टाकता त्याची ही चोरी पकडली. दीपक चहरला दिप्ती शर्मा सारखं स्टब्सला बाद करता आलं असतं. मात्र दीपकने त्याला जीवनदान देत उदारवृत्तीचे दर्शन घडवले.

हेही वाचा: IND vs SA 3rd T20 : दक्षिण आफ्रिकेने तिसरा सामना जिंकत शेवट केला गोड

या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेत तिसऱ्या सामन्यात अखेरच्या क्षणी दिप्ती शर्माने चार्ली डीनला रन आऊट केलं होतं. त्यानंतर अशा प्रकारे धावबाद करणे खिलाडूवृत्तीला धरून आहे की नाही याबाबत पुन्हा एदका गदारोळ उठला आहे.

हेही वाचा: IND vs SA : दीपक चाहर - उमेश यादवने लाज राखली! शतकी पराभव टाळला

दक्षिण आफ्रिकेचे 228 धावांचे आव्हान पार करताना भारताचा डाव 178 धावात संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेने सामना 49 धावांनी जिंकत मालिकेचा शेवट गोड केला. दरम्यान, भारताची अवस्था 8 बाद 120 धावा अशी झाली होती. मात्र दीपक चाहरने 17 चेंडूत 31 धावांची खेळी करत उमेश यादवसोबत 9 व्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी रचत भारताचा शतकी पराभव टाळला आणि लाज वाचवली. भारताकडून दिनेश कार्तिकने सर्वाधिक 46 धावा केल्या.