VIDEO मिस खिलाडी चाहिये...दीपकचा मिसेस. चाहरसोबत भन्नाट डान्स

टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाज दीपक चाहरचा पत्नी जयासोबतचा खास डान्स व्हिडीओ व्हायरल
Deepak Chahar
Deepak Chahar esakal
Updated on

नुकतंच टीम इंडियाचा स्टार क्रिकेट दीपक चाहर नुकतंच गर्लफ्रेंड जया भारद्वाज (Jaya bhardwaj) सोबत लग्नबंधनात अडकला. त्याच्या लग्नाला ती आठवडे पूर्ण झाले आहेत. मात्र, दीपकचा लग्नाचा फिव्हर काही कमी झालेला नाही. त्याने त्याच्या इंस्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला. जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

आपल्या लग्नातील डान्सचा व्हिडिओ शेअर करत दीपक चाहरने हॅशटॅगद्वारे खास माहिती दिली आहे. त्याला हा डान्स जबरदस्तीने करावा लागला आणि हा त्याचा पहिला आणि शेवटचा डान्स होता. त्यानंतर तो डान्स करणार नाही. असे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर त्याच्या या डान्ससोबत पोस्टच्या कॅप्शननेदेखील सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Deepak Chahar
इंग्लंडच्या बाजारात रोहित विराट करतायत कपड्यांची शॉपिंग, PHOTO व्हायरल

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दीपक पत्नी जया भारद्वाजसोबत मिस खिलाडी चाहिये...गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ त्याच्या लग्नातील आहे. त्याने हा व्हिडीओ शेअर करताना, 'क्रिकेट सामन्यापेक्षा जास्त दबाव होता' असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

या व्हिडीओमध्ये जयाने डार्क ब्ल्यू कलरचा लेहेंगा परिधान केला आहे. तर दीपकने केशरी रंगाची शेरवानी परिधान केली आहे. दोघे खुप सुंदर दिसत आहेत.

दीपक चाहर आणि जया भारद्वारे आग्र्यात विवाहबद्ध झाले. दोन दिवसांपासून आग्र्याच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्नाचे विधी सुरु होते.

लग्नानंतर दीपक चाहर क्रिकेटच्या मैदानात परतत आहे. पाठीच्या दुखापतीमुळे चाहर बऱ्याच दिवसांपासून क्रिकेट खेळत नाहीये. आयपीएल 2022 मध्येही तो एकही सामना खेळू शकला नाही. 29 वर्षीय दीपकने आता पुनरागमन केले आहे आणि नेटवर सराव करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Deepak Chahar
'मला वाटत नाही तो पदार्पण करेल...' आकाश चोप्राची पुन्हा एकदा भविष्यवाणी

चाहरने शेवटचा सामना २० फेब्रुवारीला खेळला. यानंतर तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आणि पुनरागमनादरम्यान त्याला पाठीला दुखापत झाली. त्यामुळे दिपक बऱ्याच दिवसांपासून एकही सामना खेळलेला नाही. आता त्याचे विश्वचषक संघात पुनरागमन करणेही कठीण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com