निवड समितीच्या चुकीमुळं इशान किशनला मिळाली सुवर्ण संधी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ishant Kishan
निवड समितीच्या चुकीमुळं इशान किशनला मिळाली सुवर्ण संधी!

निवड समितीच्या चुकीमुळं इशान किशनला मिळाली सुवर्ण संधी!

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारत अ संघात इशान किशनसह दीपक चाहरची वर्णी लागलीये. भारत अ संघ या दौऱ्यात तीन सामन्यांची चार दिवसीय मालिका खेळणार आहे. सध्याच्या घडीला दीपक चाहर आणि इशान किशन न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेत व्यस्त आहेत. पहिल्या दोन सामन्यात बाकावर बसलेल्या इशान किशनला अखेरच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थानही मिळालं आहे. ही मालिका संपताच इशान आणि दीपक दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी सज्ज होतील. भारतीय संघ 23 नोव्हेंबरला आफ्रिकेला रवाना होणार आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, दीपक चाहर आणि इशान किशन यांचे नाव भारत अ संघात समाविष्ट करण्यात आले आहे. कोलकाता येथील तिसरा टी-20 सामना संपवून ते इंडिया अ संघाच्या ताफ्यात सामील होतील. त्यानंतर ते दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर निघतील.

निवड समितीच्या चुकीमुळे झाला किशनचा फायदा

चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने भारत अ संघात केवळ एकाच विकेट किपरला स्थान दिले होते. दुसऱ्या विकेट किपरचा पर्याय म्हणून ऐनवेळी निवड समितीला इशान किशनची आठवण झाली. संघात स्थान मिळाल्यानंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये तो निश्चितच खेळताना दिसेल. बीसीसीआयच्या दुसऱ्या एका अधिकाऱ्यानेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दोन यष्टीरक्षक असणे गरजेचे होते असे म्हटले आहे. या परिस्थितीत इशान किशन एक योग्य पर्याय आमच्यासमोर होता. त्यामुळे त्याच्या नावाचा समाविष्ट करण्यात आल्याचे ते म्हणाले.

दीपकच्या स्विंगवर निवड समितीला विश्वास

दीपक चाहरने अधिक कसोटी सामने खेळलेले नाहीत. पण त्याच्यामध्ये चेंडू स्विंग करण्याची जी क्षमता आहे ती इंडिया अ साठी फायदेशीर ठरेल, असे निवड समितीला वाटते. त्यामुळेच त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. गुजरातचा प्रियांक पंचाळ इंडिया अ संघाचे नेतृत्व करणार आहे. 26 नोव्हेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे.

loading image
go to top